छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री तीर्थाटन योजने' अंतर्गत छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, जालना या चार जिल्ह्यातील एकूण ८०० नागरिकांची बौद्ध धर्मीयांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया (बिहार) यात्रेसाठी रेल्वे शुक्रवारी सायंकाळी रवाना झाली.
याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन निरोप दिला. यावेळी आमदार प्रशांत बंब, महापौर समीर राजूरकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे
आदी उपस्थित होते.
रेल्वेस्थानक परिसर रेल्वे फुलांनी सजवण्यात आली होती. उत्साही वातावरणाने प्रवाशाचे स्वागत गुलाब पुष्प देऊन वाद्याच्या गजरात करण्यात आले. लेझीम पथकाने प्रवाशांचा उत्साह द्विगणित केला. वातानुकूलित स्लीपर कोच असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
होणार नाही तसेच जेवण आणि पाण्याची व्यवस्था रेल्वेतच करण्यात आली असून आरोग्य तपासणी साठी रेल्वेमध्ये डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे. तीर्थक्षेत्र बुद्धगया बरोबरच इतर तीर्थ ठिकाण आणि पर्यटन स्थळे बघण्याची व्यवस्था या मध्ये करण्यात आली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions